१४, १९, २०, २४ व २५ सप्टेंबरला पूर्णवेळ बंदी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ सप्टेंबर २०२६) :- गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुका, नागरिकांची गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेने शहरातील विविध भागांमध्ये जड-अवजड वाहनांना तात्पुरती प्रवेशबंदी केली आहे. पोलीस उपआयुक्त वाहतूक विक्रांत देशमुख यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे.
ही प्रवेशबंदी १४, १९, २०, २४ आणि २५ सप्टेंबर २०२६ रोजी पूर्णवेळ लागू राहणार आहे. उर्वरित दिवसांमध्ये सायंकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी असेल. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे.
भोसरी वाहतूक विभागात दिघी रोड-गंगोत्री पार्क ते संविधान चौक, बनाचा ओढा ते माई वडेवाले, जायका टी जंक्शन-गायत्री मैदान-भाजी मंडई, लांडेवाडी चौक ते चांदणी चौक या मार्गांवर बंदी आहे.
निगडी विभागात चिंचवड स्टेशन-लोकमान्य हॉस्पिटल-चाफेकर चौक-जुना जकात नाका-थेरगाव घाट, कालिकामाता मंदिर-लिंक रोड-एलप्रो मॉल-चाफेकर चौक, विठ्ठल मंदिर-पॉवर हाऊस चौक-चाफेकर चौक-मोरया घाट तसेच टिळक चौक-गणेश तलाव-संभाजी चौक-विठ्ठल मंदिर परिसरात निर्बंध आहेत.
पिंपरी विभागात लिंक रोड-भाटनगर, शगुन चौक-साई चौक-आर्य समाज चौक-कराची चौक-रिव्हर रोड-काळेवाडी पूल, साई चौक-गेलार्ड चौक-शास्त्री गार्डन-नव महाराष्ट्र विद्यालय, पवनेश्वर मंदिर-काळेवाडी पूल, जाधव वडेवाले चौक-रहाटणी पूल, पिंपरी चौक-पिंपरी पूल, मोरवाडी चौक-पिंपरी पूल, डिलक्स चौक-पिंपरी गाव, वल्लभनगर अंडरपास-संत तुकारामनगर-नेहरूनगर, नेहरूनगर-तब्बकल मशीद, संतोषीमाता चौक-आंबेडकर चौक, आंबेडकर चौक-मोरवाडी, मोरवाडी-सम्राट चौक, सम्राट चौक-झिरो बॉईज चौक, केएसबी चौक-बसवेश्वर चौक-महावीर चौक तसेच मोहननगर-काळभोरनगर भागात बंदी आहे.
बावधन, वाकड, सांगवी, हिंजवडी, देहूरोड, चिखली आणि दिघी-आळंदी वाहतूक विभागातील विविध प्रमुख मार्गांवरही जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. विशेषतः चिखली विभागातील देहू-आळंदी रोड, मोशी चौक-वाय पॉइंट, कृष्णानगर-चिखली चौक, नेवाळे वस्ती-पिंगळे चौक, कुदळवाडी सर्कल-डायमंड चौक आदी मार्गांचा समावेश आहे.
दिघी-आळंदी विभागात आळंदी फाटा-आळंदी, चिंबळी फाटा-आळंदी, शेलपिंपळगाव-वडगाव घेनंद-आळंदी, धानोरे फाटा-आळंदी आणि विश्रांतवाडी रोड-देहूफाटा-आळंदी या मार्गांवरही बंदी आहे.
वाहनचालकांनी बंद मार्ग टाळून उपलब्ध पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अधिसूचनेत प्रत्येक बंद मार्गासाठी स्वतंत्र पर्यायी मार्ग नमूद करण्यात आलेला नाही. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित विभागांनी बॅरिकेडिंग व दिशादर्शक फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


















