न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १६ जुलै २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने वर्ग ‘अ’ अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सहायक आयुक्त अमित पंडित यांच्याकडे ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयासह माहिती व तंत्रज्ञान विभागाची, तर सहायक आयुक्त अतुल पाटील यांच्याकडे ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयासह अतिक्रमण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी अतिक्रमण विभागाची जबाबदारी सहआयुक्त मनोज लोणकर यांच्याकडे होती.
सहायक आयुक्त तानाजी नरळे यांच्याकडे ‘ई’ क्षेत्रीय कार्यालय विभाग असेल. सहायक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्याकडील ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाचा कार्यभार काढून त्यांना शिक्षण विभागाची जबाबदारी दिली गेली आहे. ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कामकाजाची जबाबदारी सहायक आयुक्त अश्विनी गायकवाड यांच्याकडे देण्यात आली आहे. सहायक आयुक्त उमेश ढाकणे यांच्याकडील उद्यान विभागाची जबाबदारी काढून त्यांना अग्निशमन विभागाचे काम सोपवण्यात आले आहे. याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत.
















