न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पाटणा (दि. १८ जुलै २०२५) :- बिहारमध्ये खून आणि अपहरणाच्या गुन्ह्यातील कुख्यात गुंड चंदन सिंह याची गुरुवारी हत्या करण्यात आली आहे. चंदनला एका खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली असून तो काही दिवसांपूर्वी पॅरोलवर बाहेर आला होता. पाटण्यातील पारस हॉस्पीटलमध्ये तो उपचारासाठी दाखल झाला होता. याचा सुगावा लागताच 5 जण या हॉस्पीटलमध्ये घुसले आणि त्याची गोळ्या घालून हत्या केली. या घटनेने बिहारमधील कायदा आणि सुव्यवसथा किती ढासळली आहे याची कल्पना येऊ शकते.
चंदन मिश्रा हा बक्सरचा रहिवासी होता. तो एक मोठा गुंड होता. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याच्यावर १० हून अधिक खूनाचे आरोप आहेत. लुटमार, अपहरण आणि धमकी देऊन पैसे वसूल करणे हा त्याचा गुन्हेगारी प्रकार होता. त्याने अनेक शहरांमध्ये खून केले होते. त्याने बक्सरच्या एका प्रसिद्ध चुना व्यावसायिकाची भरदिवसा हत्या केली होती. चंदन बेऊर तुरुंगातून पॅरोलवर पारस रुग्णालयात उपचारासाठी आला होता. त्याचे यकृत निकामी झाले होते. चंदन हा बक्सरचा रहिवासी होता. बक्सरमधील राजेंद्र केसरी नावाच्या चुना व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
चंदन मिश्रा १५ दिवसांसाठी पॅरोलवर बाहेर आला होता. त्याचा पॅरोल १८ जुलै रोजी संपत होता. त्याला पाटण्यातील बेऊर तुरुंगात परतावे लागणार होते. दरम्यान, त्याची प्रकृती बिघडल्यानंतर त्याच्यावर पाटण्यातील पारस रुग्णालयात उपचार सुरू होते. चंदन हॉस्पिटलमध्ये २०९ क्रमांकाच्या बेडवर झोपला होता. त्याला गोळी लागली तेव्हा तो झोपेत होता. बुधवारी त्याला डिस्चार्ज मिळणार होता. पण काही कारणास्तव त्याला डिस्चार्ज मिळू शकला नाही. चंदन मिश्राला एका खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तो गेल्या १२ वर्षांपासून तुरुंगात होता. तो बक्सर तुरुंगातून भागलपूर आणि भागलपूरहून पटनाच्या बेऊर तुरुंगात शिक्षा भोगत होता.











