न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे २०१९) :- भाजपच्या एक नवनिर्वाचित खासदार ज्यांनी शहीद हेमंत करकरेबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. शहीद हेमंत कारकरेंना मी शाप दिला होता म्हणूनच ते दहशतवादी हल्ल्यात मारले गेले, असे उद्गार काढून देशासाठी लढणाऱ्या अनेक देशप्रेमी पोलीस बांधवांचा अवमान झाला आहे, असे असतानासुद्धा भाजपने त्या व्यक्तीला टिकीट देऊन खासदार बनवले.
सत्य, अहिंसेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधीबाबत देशामध्ये काही समाजकंटकांकडून वारंवार वादग्रस्त विधाने केली जात आहेत. त्यांच्या पुतळ्याची विटंबना केली जात आहे. परंतु, त्या समाजकंटकना मोकळे सोडले जात आहे. परंतु, यांच्या अशा वागण्याने देशामध्ये अशांतता पसरत आहे. देशातील सौख्याचे वातावरण दूषित होत आहे. त्यामुळे या प्रवृतींविरोधात राज्य व केंद्र सरकारने ठोस कारवाई करायला हवी. आपल्या देशामध्ये असे दूषित वातावरण होत असताना आपण जागृत होत नसू तर हे आपल्या देशाचे दुर्दैव म्हणावे लागेल. आपल्या भावना, संवेदना लुप्त झाल्या आहेत का? असे वाटायला लागते.
त्यामुळे अपना वतन संघटनेच्या वतीने या “द्वेषमूलक प्रवृतीना सद्बुद्धी येवो” यासाठी व आपल्या भावना केंद्र व राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी शांततेच्या मार्गाने, अहिंसक पद्धतीने, संवैधानिक मार्गाने स्वतः अन्न व पाणी त्याग करून, शनिवार दि १ जून २०१९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पिंपरी चौक येथे एकदिवसीय “आत्मक्लेश आंदोलन” करणार आहोत. आपण या आत्मक्लेश आंदोलनामध्ये सहभागी होणार असाल तर ९६६५४८४७८६ या मोबाईलवर संपर्क साधावा किंवा ९६३७७५७९६९ या क्रमांकावर व्हाट्सअप करावा. आपली नावनोंदणी अत्यावश्यक आहे, असे अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांनी नागरिकांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन केले आहे.


















