न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे २०१९) :- सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांनी शरद पवार यांच्या घरातील पहिला राजकीय पराभव घडवून आणण्याची कामगिरी केली.
मावळ लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार श्रीरंग बारणे यांनी आज सोमवार (दि. २७ मे) रोजी मुंबईतील मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शिवसेनेची ताकद अधिक जोमाने फडकावत विधानसभेलाही दणदणीत विजय मिळवायचा आहे, अशी अपेक्षा ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी त्यांच्याबरोबर आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे, शहर प्रमुख योगेश बाबर, नगरसेवक प्रमोद कुटे व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.











