न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे २०१९) :- बिरादार हे २० मे रोजी भोसरीतील रोशल उद्यानाजवळून पायी जात होते. भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात रिक्षाने त्यांना जोरदार धडक दिली. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. शामराव विठ्ठलराव बिरादार (वय ४२, रा. रोशल गार्डनजवळ, भोसरी) असे मृत्युमुखी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरीतील घटनेत यशवंत बाबू पेटेकर (वय ५८, रा. पंचशिल हॉटेलच्या मागे, इंदिरानगर, चिंचवड) असे बुलोरो मोटारीच्या धडकेत ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा पुतण्या लक्ष्मण अशोक पेटेकर (वय २६) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पेटेकर रविवारी दुपारी सव्वा अकराच्या सुमारास पिंपरीतील पंचशील हॉटेलच्या पाठीमागील रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी अज्ञात बुलोरो मोटारीने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पेटेकर यांचा मृत्यू झाला. पिंपरी पोलिस पुढील तपास करत आहेत.











