न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जुलै २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने विशेष मोहीम हाती घेत महापालिकेच्या सर्व २११ बालवाड्यांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. बालवाडीतील बालकांसाठी गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेने पूर्व बाल्यावस्था काळजी आणि शिक्षण (ECCE) या रणनीतीवर आधारित विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे बालकाची साक्षरता, अंकज्ञान आणि विविध कौशल्यांमध्ये २० ते २४ टक्क्यांनी वाढ झाल्याचा दावा पिंपरी चिंचवड महापालिकेने केला आहे. पूर्वीच्या साध्या वर्गखोल्या आता खेळ आधारित शिक्षण, कथाकथन, प्रत्यक्ष अनुभव देणारे चैतन्यशील वातावरणासोबतच एकप्रकारे बाल केंद्रित ज्ञानकेंद्रांमध्ये रूपांतरित झाल्या असल्याचे म्हटले आहे.
बालवाडीतील मुले खेळाद्वारे इंग्रजी आणि विज्ञानाचे धडे गिरवत असून डॉक्टर आणि पोलीस अधिकारी मुलांशी संवाद साधत असून मुले खेळणी, ब्लॉक्स व सर्जनशील खेळांद्वारे कौशल्ये विकसित करीत आहेत. सदर उपक्रमामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे सामाजिक-भावनिक शिक्षण आणि सुरक्षित स्पर्शाचे प्रशिक्षण दिल्यामुळे मुलांना सुरक्षित आणि पोषक वातावरण मिळत आहे, असाही त्यांचा दावा आहे.
याचबरोबर महापालिका चालू शैक्षणिक वर्षापासून २० बालवाडी ‘सीएसआर’ फंडातून व २० बालवाडी महापालिकेच्या पुढाकारातून आदर्श बालवाडी निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेणार आहे. त्याचबरोबर, पर्यवेक्षक, मुख्य समन्व्ययक यांच्याकडून कामकाजाचे परीक्षण करुन बालवाडीमधील एका शिक्षकास आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहे.
प्रत्येक महिन्याला होणाऱ्या क्लस्टरमुळे अभ्यासक्रमात व शिकविण्याच्या पद्धतीमध्ये एकसूत्रता दिसून येते आहे. शिक्षिका प्रत्येक महिन्याची थिम लक्षात घेऊन दररोज वर्गाचे नियोजन करताना दिसत आहेत, व प्रत्येक बालकापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचवत आहेत.
– यमुना खंडागळे, सहाय्यक समन्वयिका, पूर्व प्राथमिक विभाग,आमची प्रत्येक महिन्यात बालकांशी निगडित विषयावर पालकसभा बालवाडी शिक्षिकांडून घेतली जाते. ज्याचा फायदा आम्हाला व आमच्या बालकांना होतो. आम्हाला आमची बालके पालिकेच्या शाळेत सुरक्षित वाटतात. प्रत्येक गोष्टीत आम्ही सहभागी होतो.
– सोनाली पाटोळे, पालक- दापोडी मुली प्राथमिक शाळा ३१…












