न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे २०१९) :- माहेराहून पैसे आणण्याची मागणी करत लठ्ठ असल्यामुळे घटस्फोटासाठी दबाव टाकत शारिरीक आणि मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना भोसरी येथे नुकतीच घडली. प्रियंका पेटकर असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
याप्रकरणी तिचा भाऊ पुष्कराज नंदकुमार प्रभुणे (वय ३२, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार केदार श्रीकांत पेटकर, सुरेखा श्रीकांत पेटकर, श्रीकांत विश्वनाथ पेटकर ( वय ६०, सर्व रा. बुरूड गल्ली, फलटण), जगदीश माडीवाला (वय ४०, रा. भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी प्रियंकाकडे माहेराहून पैसे आणण्याची वारंवार मागणी केली. तसेच प्रियका लट्ठ असल्यामुळे तिच्यावर घटस्फोट देण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. या त्रासाला कंटाळून प्रियंकाने २५ मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. भोसरी ठाण्याचे फौजदार ए. एम. सावर्डे तपास करत आहेत.











