न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०१९) :- हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गासाठी तंत्रनिकेतनाची ५. ७६ हेक्टर जमीन तसेच ग्रामीण भागातील चार हेक्टर आणि बालेवाडीतील चार हेक्टर जमीन विकसित करण्यात येणार आहे.
पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण करण्यासाठी पीएमसीला जमीन हस्तांतरित करण्यात येणार आहे. त्याचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मंत्रालयात घेतला.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता रविवारी उठविण्यात आल्यानंतर विविध पायाभूत सुविधांच्या कामांची स्थिती त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जाणून घेतली. कामांना वेग देण्याचे निर्देशही संबंधितांना दिले.











