न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०१९) :- शहरातील खासगी स्कूल चालकांनी वाहनांची तपासणी करून घेणे अनिवार्य आहे. पिंपरी आरटीओ कार्यालयाकडून स्कूल बस मालकांना व पिंपरी चिंचवड शहरातील शाळांना स्कूल बसेसची सर्व फेरतपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
त्याबाबतची यादी तयार करण्यात आली असून, त्यांना सूचना देण्याचे काम आरटीओ कार्यालयाकडून सुरू आहे. तपासणी न करता वाहन रस्त्यावर धावल्यास त्यावर कारवई करण्याचे संकेत आरटीओ कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.
उच्य न्यायालयाच्या आदेशानुसार स्कूल बसची तपासणी करणे क्रमप्राप्त आहे. यंदा निवडणुकीच्या कामामुळे ‘आरटीओ’ चे सर्व अधिकारी व कर्मचारी व्यस्त होते. त्यातून वेळ मिळाल्यानंतर शाळेत विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसची माहिती काढण्यात आली आहे. त्यांना सूचना करण्यात आल्या असून, अधिकारी व कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती आरटीओ कार्यालयाकडून मिळाली आहे.











