न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- मा. उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या सोमवार दिनांक १ ऑक्टो. रोजी पिंपरी-चिंचवड शहरात येणार असून लोकसभा-विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात पक्षाच्या तयारीबाबत धांडोळा घेणार आहेत.
यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, मा. आमदार, मा. महापौर, मनपाचे आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक आकुर्डी येथे दुपारी चार वाजता होणार आहे, अशी माहिती शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी न्यूज पीसीएमसीशी बोलताना दिली.