न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व चिंचवड ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस पक्षाचे लोकनेते व मध्यप्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ज्योतीराज शिंदे यांची चिंचवड ब्लॉक काँग्रेस कमिटीचे मा. अध्यक्ष संदेश नवले यांनी नुकतीच भेट घेतली.
यावेळी त्यांना महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती भेट देण्यात आली.
याप्रसंगी निवेदनाच्या माध्यमातुन शिंदे यांना आळंदी, देहू तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरीगड व राजधानी रायगड या पवित्र स्थळी भेट देण्याची विनंती करण्यात आली. तसेच या दौऱ्यानिमित्त राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळेल असे नवले यांनी सांगितले.
यावेळी आबा खराडे, नितेश घोलप, कृष्णा लोखंडे, किशोर काळे व संदेश नवले आदी उपस्थित होते .