न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०१९) :- भावाने जमिनीवर अतिक्रमण केल्याने राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक कैलास थोपटे यांनी पोलिसात धाव घेतली आहे. याप्रकरणी रविवारी (दि. २६) रोजी वाकड पोलिस ठाण्यात माजी नगरसेवकांच्या भावासह वहिनी आणि अन्य तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारुती गबाजी थोपटे (वय ४५), सोनाली मारुती थोपटे (वय ४०, दोघे रा. गोडांबे कॉर्नर, रहाटणी) यांच्यासह अन्य तिघांवर गुन्हा नोंद करण्यात
आला आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी येथे फिर्यादी कैलास थोपटे यांचे भाऊ विकास थोपटे यांच्या नावे रहाटणी येथील सर्वे नं ६९ / ३ / ५ मध्ये ३२ गुंठे जमीन आहे. रविवारी आरोपी मारुती याने या जमिनीमध्ये जेसीबीने खोदकाम करून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. तसेच कैलास थोपटे यांना शिवीगाळ करीत बघून घेण्याची धमकी दिली. पुढील तपास वाकड पोलिस करीत आहेत.











