- अनेक पर्यावरण अभ्यासकांचा गौरव..
- तज्ज्ञांकडून वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २९ जुलै २०२५) :- निसर्ग मित्र समिती पुणे व हस्ती बँक दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पर्यावरण परिषद २०२५ शनिवार, २६ जुलै रोजी पुण्यातील यश रीगन्सी हॉल, शिवाजीनगर येथे उत्साहात संपन्न झाली. राज्यभरातून आलेल्या पर्यावरण प्रेमींनी व अभ्यासकांनी या परिषदेत सहभाग घेतला.
या कार्यक्रमाला पुणे महामेट्रोचे महाव्यवस्थापक कॅप्टन राजेंद्र सनेर, कृषी संचालक कैलास मोते, राज्य नियोजन विभागाचे उपसचिव हंसध्वज सोनवणे, आयएएस अधिकारी महेश पाटील, मुख्य वनसंरक्षक नानासाहेब लडकत, हस्ती बँकेचे चेअरमन कैलास जैन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संयोजन समितीच्या आर.डी. पाटील, प्रेमकुमार अहिरे, डी.बी. पाटील, संतोष पाटील, विश्वास पगार, दिनेश बोरसे आदींनी आयोजनात मोलाची भूमिका बजावली.
परिषदेमध्ये पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अभ्यासकांना ‘निसर्गमित्र महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ आणि ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. पुण्याच्या कैलास मोते, डॉ. विजयकुमार पाटील, सुनीता पाटील, ललिता सोनवणे, आशाताई सूर्यवंशी, गौरव मालपुरे, सागर देशमुख यांच्यासह अनेकांचा सन्मान झाला. एन.झेड. देवरे, पुष्पाताई डोंगर पाटील, डॉ. गुलाब इंगोले, ललित जैन (कासारेकर संस्था, पुणे) यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.
परिषद अध्यक्ष कॅप्टन सनेर यांनी पर्यावरण संकटावर उपाय सुचवत नागरिक, तज्ज्ञ व प्रशासन यांच्यात समन्वय साधण्याचे आवाहन केले.
पर्यावरण अभ्यासक डॉ. विजयकुमार पाटील यांनी खान्देश भागातील वृक्षसंवर्धन चळवळीचा उल्लेख करत सरकारी सहकार्याची आवश्यकता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी.बी. पाटील, सूत्रसंचालन संतोष पाटील व आभार प्रदर्शन विश्वास पगार यांनी केले.












