- फ्रेशर पार्टीवरून विद्यार्थ्यांचा कॉलेजबाहेर र्हाडा..
- सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल, सहा अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जुलै २०२५) :- पिंपरीतील संत तुकारामनगर येथील डी. वाय. पाटील सिनियर कॉलेजच्या गेटबाहेर कोयत्याने हल्ला करून कॉलेजच्या विद्यार्थ्याला जखमी करण्यात आले.
याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा (क्र. २६७/२०२५) दाखल करण्यात आला आहे. घटना २८ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास घडली.
फिर्यादी तन्मय कांबळे (१८, रा. कासारवाडी) हे त्यांच्या मित्रासोबत कॉलेजमध्ये असताना आरोपी अभिषेक गिरी व अल्फान पठाण यांच्याशी फ्रेशर पार्टीवरून वाद झाला. त्यानंतर कॉलेज सुटल्यावर आरोपींनी आपल्या इतर साथीदारांना शिवराज तलवारे, यश पवार, अदिनाथ गायकवाड, सोहेल शेख, बिराज विश्वकर्मा, विधीसंघर्षित बालक व निहाल (पूर्ण नाव अज्ञात) सोबत बोलावून तन्मय कांबळे यांच्यावर हल्ला केला.
या गोंधळात निहालने दुचाकी अंगावर घालून, तर सोहेल शेख व शिवराज तलवारे यांनी कोयत्याने डोक्यावर, हातावर व पाठीवर वार करून गंभीर जखमी केले.
आरोपींनी “आम्ही डी. वाय. पाटीलचे भाई आहोत” असे म्हणत कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली व घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून, इतरांचा शोध सुरू आहे.
आरोपींवर भारतीय न्यायसंहिता, हत्यार कायदा व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि आटवे करत आहेत.












