न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०१९) :- कासारवाडी येथील पालिकेच्या ड्रेनेज लाइनचे काम सुरू असताना इमारतीची भिंत कोसळून सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यास पाठीशी घातल्याच्या निषेधार्थ युवासेनेचे प्रतीक्षा घुले, नीलेश हाके, रवी नगरकर, सनी कड, ओंकार जगदाळे, नितीन वाघमारे, दिनेश चव्हाण, अजित बोराडे यांनी उपोषण केले होते.
महापालिकेच्या लेखी आश्वासनानंतर ते स्थगित करण्यात आले. दोषी अधिका-यांना निलंबित करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाच गुन्हा दाखल करावा, अशी मागणी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केली होती. पालिकेने कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंत शिवसेना जिल्हासंघटिक सुलभा उबाळे, शहरसंघटिका ऊर्मिला काळभोर यांच्या उपस्थितीत उपोषण स्थगित करण्यात आले.
याप्रसंगी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, जितेंद्र ननावरे, राजेश वाबळे, दीपक भोंडवे, रूपेश कदम, अभिजित गोफण, अनिता तुतारे, दीपक काटे आदी उपस्थित होते.











