- ‘UNCLOG_Chakan_MIDC’ मोहिमेला गती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. ३० जुलै २०२५) :- चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांवर ठोस उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने आणि औद्योगिक संस्थांच्या #UNCLOG_Chakan_MIDC मोहिमेअंतर्गत मुंबईत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
बैठकीला विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि औद्योगिक क्षेत्राशी संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आमदार लांडगे यांनी चाकण औद्योगिक पट्टा, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६०, ६५ आणि ५४८ डी वरील कामे, रस्त्यांचे विस्तारीकरण, वाहतूक व्यवस्थापन, फ्रेट कॉरिडॉर व ‘सिंगल पॉईंट ॲथॉरिटी’ स्थापनेची मागणी केली. मंत्री भोसले यांनी यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
“हिंजवडीप्रमाणे चाकण समस्यामुक्त करण्यासाठी आम्ही सक्रिय पाठपुरावा करत आहोत. लवकरच मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली जाईल,” असे आमदार लांडगे यांनी सांगितले.


















