- कर्तृत्वावरच पद मिळणार असल्याचे शहराध्यक्षांचे स्पष्ट संकेत”….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०२५) :- पिंपरी-चिंचवड भाजप शहर जिल्हा समितीच्या नव्या विभागीय समित्यांसाठी इच्छुक कार्यकर्त्यांच्या मुलाखती नुकत्याच उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्या. या प्रक्रियेत एकूण १८० हून अधिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. मुलाखतीदरम्यान इच्छुकांकडून संघटनात्मक अनुभव, सामाजिक योगदान, पक्षनिष्ठा आणि भविष्यातील कार्ययोजनांवर सविस्तर चर्चा झाली.
या प्रक्रियेअंतर्गत जिल्हा कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष, ८ उपाध्यक्ष, ४ सरचिटणीस (यात १ महिला व १ SC/ST आरक्षित), ८ चिटणीस, १ कोषाध्यक्ष, ७ महिला व २ SC/ST जिल्हा पदाधिकारी तसेच ६९ सदस्य (२३ महिला, ४ SC/ST) यांचा समावेश होणार आहे. याशिवाय विविध मोर्चे, प्रकोष्ठ व सेल अध्यक्षांचीही निवड केली जाणार आहे.
ही संपूर्ण प्रक्रिया भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यांनी स्पष्ट केले की, “पद ही केवळ प्रतिष्ठा नसून जबाबदारी आहे. कर्तृत्व, निष्ठा आणि संघटनेप्रती समर्पण यांच्या आधारेच निवड केली जाईल. शिफारसीपेक्षा गुणवत्ता महत्वाची आहे.”
या निवड प्रक्रियेमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य, पारदर्शकता आणि स्पर्धात्मकता निर्माण झाली असून, नव्या नेतृत्वाचा मजबूत पाया रचला जात आहे. लवकरच निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांची अधिकृत यादी जाहीर केली जाणार आहे.


















