न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०१९) :- दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सोन्याची दागिने आणि रोकड असा ३ लाख १८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. २६) रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास पिंपरीत उघडकीस आली.
याप्रकरणी भुजंग रंगनाथ गायकवाड (वय ५२, रा. बौध्दनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीचे घर बंद असताना चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटात ठेवलेले ५ लाख १८ हजार रुपये किमतीचे व २ लाखांची रोकड घेऊन पसार झाले.











