न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०१९) :- आंद्रा धरणातून शहरासाठी उचलण्यात येणा-या १०० दशलक्ष लिटर पाण्यासाठी इंद्रायणी नदीवरील देहू बंधारा येथुन नियोजित चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्यात येणार आहे.
महापालिकेकडून आंद्रा धरणातून पाणी उचलण्याच्या योजनेसाठी वेगवेगळ्या कामांच्या तीन निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्र, देहू बंधारा ते चिखली या अंतरात जलवाहिनी टाकणे आणि देहू बंधारा येथे हेडवर्क्सची कामे अशा तीन निविदांचा त्यामध्ये समावेश आहे.
तिन्ही निविदा मिळून १०८ कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे काम पावसाळ्यानंतरच प्रत्यक्ष सुरू होऊ शकेल. ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी दोन ते अडीच वर्षांचा कालावधी लागणार आहे, असे सह-शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.











