न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०१९) :- निगडीतील अमरधाम स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीचे दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर विद्युतदाहिनी सुरु करण्यात आली आहे. नवीन काँईल, ब्रिक्स बसविल्या आहेत. त्यामुळे आता वारंवार विद्युतदाहिनी नादुरुस्त होणार नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत निगडीतील अमरधाम स्मशानभूमीत विद्युतदाहिनी बसविण्यात आली आहे.
विद्युत दाहिनिस १५ वर्ष पूर्ण झाली आहेत. विद्युत दाहिनीचे आयुष्य संपले आहे. त्यामुळे विद्युतदाहिनी वारंवार नादुरुस्त होत होती. नादुरुस्त झाल्यावर महिनामहिनाभर दाहिनी बंद ठेवली जात होती. त्यामुळे नागरिकांचे हाल होत होते. त्यासाठी महापालिकेने तातडीने अमरधाम स्मशानभूमीत विद्युतदाहिनी सुरु करण्याची मागणी जोर धरत होती.
स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी काही दिवस बंद ठेवली होती. हे काम पूर्ण झाले आहे. विद्युतदाहिनी सुरु केली आहे. नवीन कॉईल, नवीन ब्रिक्स बसविल्या आहेत. विटा देखील बदललेल्या आहेत. त्यामुळे आता कोणतीही अडचण येणार नहीं. विद्युतदाहिनी वारंवार नादुरुस्त होणार नसल्याची खबरदारी घेण्यात आली आहे.
– प्रवीण घोडे , कार्यकारी अभियंता पिं. चिं. मनपा.















