न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०१९) :- सहा वर्षाच्या मुलासोबत दोन अल्पवयीन मुलांनी अनैसर्गिक लैंगिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आठ दिवसांपूर्वी भोसरी येथे घडली. याप्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार १३ आणि १२ वर्षाच्या अल्पयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ दिवसांपूर्वी आरोपींनी फिर्यादी यांच्या सहा वर्षाच्या मुलासोबत एका खोलीत अनैसर्गिक कृत्य केले. मुलाने घरच्यांना सांगितल्यावर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ मुंडाळ तपास करत आहेत.














