न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड दि. 15 ऑगस्ट 2025) :- वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर कमला एज्युकेशन सोसायटी व क्विक हिल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” या अभियानांतर्गत अग्निशामक दलात सायबर जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या प्रोत्साहनाने, खजिनदार डॉ. भूपाली शहा, संचालिका डॉ. तेजल शहा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. हर्षिता वाच्छानी यांच्या संयोजनाखाली प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीजच्या विद्यार्थ्यांनी ही मोहीम पार पाडली.
अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी पासवर्ड व्यवस्थापन, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, फिशिंग व व्हॉट्सअॅप फसवणूक टाळणे, तसेच सरकारी व बँक फसवणुकीची ओळख या विषयांवर मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष उदाहरणे व व्हिडिओद्वारे जागरूकता वाढविण्यात आली. मोहिमेत गायत्री गुंजालोर, फैसल इस्लाम, रोनित चौधरी व दुर्वा साळुंखे यांनी सहभाग घेतला.
प्रकल्प समन्वयिका डॉ. हर्षिता वाच्छानी, अध्यक्षा श्रावणी सावंत, सचिव आकाश ठाकूर, कार्यक्रम संचालक ऑलिव वर्गीस, मीडिया डायरेक्टर मानसी वाडेकर यांनी कार्य पाहिले. क्विक हिल सीएसआर एक्झिक्युटिव्ह अजय शिर्के, गायत्री केसकर व दिपू सिंह यांनी मार्गदर्शन केले.
या उपक्रमामुळे अग्निशमन दलातील सदस्यांमध्ये डिजिटल सुरक्षा जाणिवा अधिक दृढ झाल्या असून मोहीम यशस्वी ठरली.












