न्यूज पीसीएमसी नेटवर्क
प्राधिकरण (दि. २० ऑगस्ट २०२५) :- श्री द्वारकाधिश सेवा मंडळ ट्रस्ट व गरवी गुजराथी समाजातर्फे प्राधिकरण येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या धार्मिक सोहळ्यात पुजेचा मान निखील व पायल खेडकर यांना मिळाला.
कार्यक्रमात मंडळाच्या अध्यक्षा किरण पटेल यांच्यासह महिलांनी भजन, कीर्तन, रास-गरबा तसेच श्याम तरंग या भक्तिगीतांचा आकर्षक कार्यक्रम सादर केला. पुनम पटेल, हेमलताबेन पटेल, भानुबेन मकवाणा, इंदु रामाणी, जस्मिना पटेल, कृष्णा पटेल, दिनूबेन सिद्धपुरा, लिना कक्कड, दुद्धीबेन पटेल, नेहल मकवाणा यांच्यासह अनेक भाविक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या सोहळ्याचे संयोजन गरवी गुजराथी समाजाचे अध्यक्ष मुकेश चुडासमा यांनी केले. त्यांच्यासह जिग्नेश पटेल, अभिषेक पटेल, एल.जी. पटेल, भाईलाल ठक्कर, स्वप्नील भागवत, गैरव रामानी, मुकेश पंडया, विराज पटेल, रमेश चुडासमा, करण चुडासमा, नयन तन्ना आदी कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी केला.















