न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. २९ ऑगस्ट २०२५) :- हिंजवडी पोलिसांनी लग्नाचे अमिष दाखवून युवतीची फसवणूक केल्याप्रकरणी एका सव्वीस वर्षीय युवकाला अटक केली आहे. ही घटना मार्च २०२५ ते ८ ऑगस्ट २०२५ दरम्यान नेरे दत्तवाडी (ता. मुळशी, जि. पुणे) येथे घडली.
फिर्यादी २४ वर्षीय युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सुनिल शालीकराम पराळे (रा. मारुंजी, हिंजवडी, पुणे) हा तिच्या ओळखीचा असून, त्याने विश्वास संपादन करून तिला लग्नाचे आश्वासन दिले. मात्र, या आश्वासनाचा गैरफायदा घेत त्याने वारंवार शारीरिक संबंध ठेवले.
नंतर “तुझी जात वेगळी आहे” असे सांगत आरोपीने लग्नास नकार दिला आणि युवतीची फसवणूक केली. याबाबत पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सपोआ कु-हाडे (वाकड विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू आहे.













