- दोन अभियंते व एक वरिष्ठ अधिकारी अन्यत्र…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आकुर्डी (दि. ०३ सप्टेंबर २०२५) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) तिघा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अभियांत्रिकी विभागातील कार्यकारी अभियंते संदीप खलाटे आणि संजय पाटील यांची बदली करण्यात आली आहे. तर, लेखा विभागातील वरिष्ठ अधिकारी बसवेश्वर पाटील यांची पदोन्नतीसह बदली झाली आहे.
या बदल्यांनंतर अभियांत्रिकी विभागात मुख्य अधिकारी १ व २ अशी दोन्ही महत्त्वाची पदे रिक्त झाली आहेत. यामुळे विविध प्रकल्पांचे कामकाज आणि पाहणी प्रक्रियेत तात्पुरती अडचण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पीएमआरडीएकडून अतिक्रमण, विकास परवानगी, अग्निशमन आणि गृहनिर्माण यांसारख्या विभागांतही अनेक पदे रिक्त असल्याने कामाचा ताण विद्यमान अधिकाऱ्यांवर वाढला आहे. दरम्यान, नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची प्रतिक्षा असून, विभागीय कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी तात्पुरत्या जबाबदाऱ्या इतर अधिकाऱ्यांकडे सोपवल्या जात आहेत.










