न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. ०३ सप्टेंबर २०२५) :-गणपती वर्गणीच्या नावाखाली लॉजिंग मॅनेजरकडून पैसे उकळल्याचा प्रकार पिंपळे सौदागर परिसरात उघडकीस आला आहे. काळेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी अद्याप फरार आहेत.
फिर्यादी अखिलेश कुमार महावीर गौतम (वय २५, मॅनेजर, लॉजिंग) यांच्या तक्रारीनुसार, सचिन व अजय (पूर्ण नावे माहित नाहीत) आणि तिसरा अनोळखी इसम यांनी ५ हजार रुपयांची वर्गणी मागितली.
दरम्यान त्यांनी पावती बुकमधील १२०० रुपयांची पावती देत PhonePe द्वारे पैसे पाठविण्याची सक्ती केली. पैसे न दिल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्यानंतर त्यांनी १२०० रुपये रोख स्वरूपात घेतले. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम नुसार गुन्हा दाखल झाला असून, काळेवाडी पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.












