न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. ०३ सप्टेंबर २०२५) :- पार्किंगच्या वादातून चुलत्याने पुतण्याच्या भावावर लोखंडी फावड्याने हल्ला केल्याची घटना समर्थ नगर, निगडी येथे घडली. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी तुकाराम सखाराम काळभोर (वय ६०, रा. समर्थ नगर) याला अटक करण्यात आली आहे. फिर्यादी महेश ज्ञानोबा काळभोर (वय ३५) यांनी दिलेल्या फिर्यादीत आरोपीने कामगाराला पार्किंगसमोर वाहन उभे करू नकोस म्हणून शिवीगाळ केली. त्यावरून फिर्यादीचा भाऊ जाब विचारण्यासाठी गेल्यावर आरोपीने मागील वादाचा राग मनात धरून लोखंडी फावड्याने त्याच्या डोळ्याजवळ वार केला.
यात गंभीर दुखापत झाली असून, आरोपीने “सगळ्यांना जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिली. देहूरोड पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.










