न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०१९) :- बारावी परीक्षेचा मंगळवार (दि. २८) रोजी ऑनलाईन निकाल जाहीर झाला. ऋषिकेशने बारावीची परीक्षा दिली होती. बारावीच्या परीक्षेत तो नापास झाला. या नैराश्यातून त्याने समर्थनगर येथील राहत्या घरी छताच्या हुकाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला.
दुपारी सव्वातीनच्या सुमारास घटनेची माहिती सांगवी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ऋषिकेशला ताकाळ उपचारासाठी ऑध रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
ही घटना मंगळवारी (दि. २८) रोजी नवी सांगवी येथे घडली. ऋषीकेश विलास पांचाळ (वय १७, रा. समर्थनगर, नवी सांगवी) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.











