न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे २०१९) :- टाटा मोटर्समधील कर्मचारी आणि जुन्या पिढीतील कौसल्या भागूजी तुपे (वय ७८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्याच्या मागे तीन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे.
पतीच्या निधनानंतर त्यांनी टाटा मोटर्समध्ये १९ वर्ष नोकरी केली. कुटुंबाचा गाडा चालविला. मुलांना शिक्षण दिले. विविध सामाजिक उपक्रमातही त्यांचा सहभाग होता. स्वर सागर संगीत महोत्सव संयोजक आणि महापालिकेचे सह शहर अभियंता प्रवीण तुपे यांच्या त्या मातोश्री होत.











