न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ०७ सप्टेंबर २०२५) :- काळेवाडी परिसरात झालेल्या भांडणातून एका युवकावर लाकडी फळीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी शुभम आदिवारेकर (वय २८, रा. काळेवाडी) याच्यासह काही साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप अटक झालेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ५ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास विजयनगर, काळेवाडी येथील पाचपीर चौकाजवळील मोकळ्या जागेत घडली. फिर्यादी अनिल अशोक काटे (वय ४१) यांचा भाऊ सुरेश काटे यास आरोपींनी मारहाण केली होती. त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपींना ‘माझ्या भावाला का मारले’ असे विचारले असता आरोपींच्या साथीदारांनी त्यांना पकडले आणि शुभम आदिवारेकर याने त्यांच्या डोक्यात लाकडी फळीने प्रहार करून गंभीर जखमी केले.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील कलम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनिरीक्षक नाईक निंबाळकर करत आहेत.












