- चिखलीत खाजगी नोकरीदार व्यक्तीला बनावट वॉट्सअॅप ग्रुपद्वारे गंडा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. ११ सप्टेंबर २०२५) :- ब्लॉक ट्रेडिंगमधून मोठा आर्थिक फायदा होईल, असे आमिष दाखवून खाजगी नोकरी करणाऱ्या व्यक्तीची तब्बल २९ लाख ४१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार चिखलीत उघडकीस आला आहे.
फिर्यादी अनुपम गुळवेलकर (वय ४०, रा. पुर्णानगर, चिखली) यांना अनोळखी व्यक्तींनी व्हॉट्सअॅपवर “G2 ICICI Securities Group” या ग्रुपमध्ये अॅड केले. ग्रुपमधून ब्लॉक ट्रेडिंगद्वारे परतावा मिळेल असा खोटा विश्वास निर्माण करून विविध बँक खात्यांमध्ये एकूण २९,४१,००० रुपये जमा करून घेण्यात आले. मात्र नंतर परतावा मिळाला नाही आणि फसवणुकीचा प्रकार समोर आला.
या प्रकरणात अनेक मोबाईल क्रमांक तसेच नामांकित बँक खात्यांचा वापर झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम व माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.













