- पादचारी महिलेचा मृत्यू; चालक अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२५) :- तळवडे येथील त्रिवेणीनगर भागात भरधाव कारने दिलेल्या धडकेत एका पादचारी महिलेचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना १४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता टॉवर लाईन रस्त्यावर घडली.
मृत महिला संध्या मडीवाल (४९, रा. लातूर) या आपल्या मुलीकडे जाण्यासाठी पायी रस्त्याने जात असताना, मारुती सुझुकी इको या कारने त्यांना जोराची धडक दिली. अपघातानंतर त्या गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्या.
अपघात घडवून वाहनचालक विनायक जगताप (३८, रा. निघोजे, ता. खेड, जि. पुणे) हा घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला अटक केली आहे.
चिखली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो.उपनि. देवकर करत आहेत.













