न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. १७ सप्टेंबर २०२५) :- १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राज्यभर राबवण्यात येणाऱ्या ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमाचा शुभारंभ पुण्यातील गणेश कला-क्रीडा मंच येथे झाला. या निमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने माहिती व जनसंपर्क विभाग, समाज विकास विभाग आणि विविध विभागांनी नागरिकांसाठी माहिती दालन उभारले.
आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेल्या दालनात पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक स्वच्छता, पर्यावरण, गृहनिर्माण, वाहतूक, अग्निशमन, कर व परवाना सेवा, ई-गव्हर्नन्स या सेवांची माहिती देण्यात आली. जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, संदीप पाटील यांच्यासह विविध अधिकारी व नागरिकांनी दालनाला भेट दिली. हा उपक्रम नागरिकांपर्यंत महापालिकेच्या सेवा व योजनांची थेट माहिती पोहोचविणारा ठरला.