न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०१९) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी निमित्त शहर भाजपतर्फे जल्लोष करण्यात आला. लाडू वाटप करण्यात आले. तसेच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ३०३ जागा जिंकून घसघशीत बहुमत मिळवले. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. या कार्यक्रमानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये जल्लोष करण्यात आला.
संत तुकारामनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळील मैदानात स्क्रीन लावण्यात आला होता. यावेळी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, नगरसेवक शीतल शिंदे, प्रमोद निसळ उपस्थित होते. कृष्णानगर येथील शनी मंदिर मैदान येथेही स्क्रीनवर शपथविधी सोहळा पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
पूर्णानगर, शाहूनगर, स्पाईन रस्ता येथे एलईडी स्क्रीनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याचे आयोजन संध्याकाळी करण्यात आले. या वेळी उपस्थितांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी नगरसेवक व भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











