न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिका भवनात शहरातील खासदार व आमदारांच्या वाहनांसाठी जागा राखीव ठेवा, अशी सूचना स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केली आहे.
शहरातील खासदार व आमदार विविध कामांसाठी पालिकेत सतत येत असतात. त्यामुळे त्यांच्या वाहनांसाठी प्राधान्याने जागा उपलब्ध होणे गरजेचे आहे . पालिका प्रवेशद्वारासमोरील दिव्यांग व्यक्तींच्या वाहनांसाठी राखीव ठेवलेली जागा खासदार व आमदारांच्या वाहनांसाठी राखीव ठेवावी, अशी सूचना मडिगेरी यांनी केली आहे.











