न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०१९) :- हॉटेलमध्ये काम करणा-या नोकराने हॉटेल मालकाच्या घरातील एक लाख रुपये चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. २९) रात्री साडेआठच्या सुमारास कासारवाडी येथे घडली. याप्रकरणी हॉटेलमालक रुपेश ज्ञानेश्वर चुंबरे (२६, रा. कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार दिलीप यादव (रा. मुंबई) या नोकराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी रुपेश यांचे कासारवाडी येथे मराठा खानावळ नावाचे हॉटेल आहे. आरोपी दिलीप हा या हॉटेलमध्ये काम करतो. रुपेश यांच्या मेहुण्यांनी त्यांना हॉटेलच्या कामासाठी एक लाख रुपये उसने दिले होते. ही रक्कम रुपेश यांनी घरी ठेवली. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी दिलीप याने रुपेश यांचे मित्र सचिन काळे यांच्याकडून घराची चावी घेतली व घरातील एक लाख रुपयांची रोकड चोरून नेली.











