न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने सर्वसाधारण सभेत ठराव पारित करून फुगेवाडी गावचे ना गावठाण क्षेत्र ना दाट लोकवस्तीचे क्षेत्र म्हणून घोषणा केली. मात्र, संपूर्ण फुगेवाडी गावाचे क्षेत्र गावठाण किंवा दाट लोकवस्तीचे क्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी मनोज वाखारे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली.
निवेदनात नमूद केले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील फुगेवाडी विकासापासून वंचित राहिली आहे. फुगेवाडीच्या पुढील बाजूस जुना मुंबई-पुणे हायवे, मेट्रो प्रकल्प, बीआरटी प्रकल्प यामुळे झालेले रोड बायडिंग तसेच मागील बाजूस भारतीय रेल्वे यामुळे फुगेवाडीच्या विस्तारास खूपच कमी वाव आहे. त्यामुळे या भागातील लोकांच्या विकासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सन २०१९ च्या नवीन डीपी प्लॅनमध्ये हा विषय मार्गी लावणे गरजेचे आहे.











