- शेकडो उद्योजकांनी घेतला लाभ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ सप्टेंबर २०२५) :- एकच ध्यास उद्योजकता विकास या उक्तीप्रमाणे अनेक गोष्टींवर चाकण MIDC उद्योजक संघटना काम करत असते. त्यातीलच एक भाग गेली 5 वर्षे चाकण MIDC उद्योजक संघटना दर महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी अव्यहातपणे उद्योजकांच्या विकासासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत व्यक्ती व संस्था यांना सेमिनार घेण्यासाठी आमंत्रित करीत असते. याचा प्रत्यक्षरीत्या फायदा हा उद्योजकांना होत असतो.
त्याप्रमाणे 19 सप्टेंबर 2025 शुक्रवार रोजी चाकण MIDC उद्योजक संघटनेने हॉटेल टी चिंचवड मध्ये Succession Planning – for Property & Business या विषयामध्ये 18 वर्ष अनुभव असलेले तज्ञ सौ दीपा होटवानी मॅडम यांचे सेमिनार आयोजित केले होते.
या सेमिनार मध्ये सौ दीपा होटवानी मॅडम यांनी ऊद्योजकांच्या मनातील भ्रामक कल्पना दूर केल्या जसे की नॉमिनी केलं म्हणजे आपले काम संपले तर तसे नाही कारण त्याला देखील कोर्टामध्ये आक्षेप घेता येऊ शकतो, त्यामुळे अगदी तरुण वयापासून वृद्धापकाळपर्यंत मृत्युपत्र करणे किती गरजेचे आहे, ते कसे करावे. शासनाचे याबाबत कोणकोणते नियम आहेत ? कशाप्रकारे Succession Planning न केल्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतात ? या विषयावरती सखोल माहिती उद्योजकांना मिळाली, अनेक उद्योजकांनी आपापले प्रश्न देखील उपस्थित केले व त्यावर अतिशय समाधानकारकरित्या सौ होटवानी मॅडम यांनी उत्तरे दिली.
सदर सेमिनारसाठी शेकडो ऊद्योजक ऊपस्थित होते. काही उद्योजकांनी आपले आई-वडील तसेच पत्नीला देखील बरोबर आणले होते. कार्यक्रमाची प्रस्तावना व सांगता चाकण MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्ष श्री जयदेव अक्कलकोटे यांनी केले.












