- मोरेवस्ती सोसायटीतील नागरिकांच्या पाणी व ड्रेनेज समस्यांचे तत्काळ निराकरण…
 
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ सप्टेंबर २०२५) :- शहर भाजपचे युवा नेते पांडाभाऊ साने यांनी मोरेवस्ती येथील विठ्ठल-रुख्मिणी हौसिंग सोसायटीमधील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्या मार्गी लावून नागरिकांना दिलासा दिला आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून सोसायटीतील चेंबर लाईन चॉकअप झाल्याने घाणपाणी घरामध्ये शिरत होते. नागरिकांच्या तक्रारीनंतर पांडाभाऊ साने यांनी स्वतः सोसायटीमध्ये जाऊन पाहणी केली. त्यांनी पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मोठ्या ड्रेनेज सफाई गाडीद्वारे चेंबर लाईनची संपूर्ण स्वच्छता करून घेतली. यामुळे नागरिकांची मोठी समस्या दूर झाली.
तसेच, या सोसायटीमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या होती. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त होते. याची दखल घेऊन पांडाभाऊ साने यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून स्वखर्चाने जेसीबीच्या सहाय्याने पाईपलाईनचे काम करून प्रमुख जलवाहिनीशी जोडणी केली. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील निकाली निघाला.
या कामांमुळे नागरिकांनी पांडाभाऊ साने यांचे कौतुक केले असून, “ही जनसेवा निवडणुकीपुरती मर्यादित नसून सदैव सुरूच राहील,” असा निर्धार साने यांनी व्यक्त केला.
                                                                    
                        		                    
							












