न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०१९) :- पुणे जिल्हा को ऑप हौसिंग फेडरेशनच्या पिंपळे सौदागर शाखा आणि सिटी सर्व्ह कार्यालय यांच्यावतीने संयुक्तपणे येत्या १ जून रोजी प्रॉपर्टी कार्ड अभियानाच्या दुस-या फेरीस येथे सुरुवात होणार आहे.
पिंपळे सौदागर येथील गणेश रेसिडेन्सी येथे सहकार दरबारचे आयोजन करुन सकाळी अकरा ते दुपारी एक पर्यंत प्रॉपर्टी कार्डचे वाटप करण्यात येईल. यावेळी पिंपरी चिंचवडचे शहर सर्वेक्षण अधिकारी शिवाजी भोसले हे मार्गदर्शन करतील व हौसिंग सोसायट्यांनी आपले प्रॉपर्टी कार्ड घेवून जावे, असे आवाहन फेडरेशनतर्फे करण्यात आले आहे.















