न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०१९) :- सोन्याच्या बांगड्या असल्याचे सांगून एका गोल्ड लोन देणाच्या कंपनीला १ लाखाना गंडा घालण्यात आला. हा प्रकार ११ ऑक्टोबर २०१८ रोजी पिंपळे गुरव येथे घडला आहे. याप्रकरणी बुधवारी (दि. २९) रोजी सांगवी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत अशोक शिवाजी माळी (३८, रा. पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विजय कड़बाळ गायकवाड (३९, रा. पिंपळेगुरव) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी माळी इंडिया इन्फोलाइन फायनान्स लिमिटेड या कंपनीत नोकरी करतात.
आरोपी गायकवाड याने सोन्याचे कोटिंग असलेल्या बांगड्या देऊन माळी यांच्या कंपनीतून १ लाख ४ हजारांचे कर्ज घेतले. कर्जाचे हप्ते येत नसल्याने माळी यांनी बांगड्याची तपासणी केली असता, त्या बांगड्या सोन्याच्या नसल्याचे उघड झाले. माळी यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.











