न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे २४ कोटी ३५ लाख रुपयांच्या खर्चास आज स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडीगेरी होते. खेळाडू दत्तक योजने अंतर्गत पात्र खेळाडूंना दत्तक योजना लाभापोटी ७३ लाख रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
या बैठकीत पीएमपीएमएलला त्यांच्या संचलन तूट व विविध प्रकारचे पासेस करिता ७ कोटी ५० लाख रुपये अदा करण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच जेएनएनयूआरएम योजने अंतर्गत विकसित होणार्या काळेवाडी ते देहु आळंदी रस्त्याच्या विकसनासाठी मंजूर विकास आराखड्यातील ४५ मीटर रुंद रस्त्याच्या जागा संपादनासाठी येणार्या ७ कोटी रुपयांच्या खर्चासही या बैठकीत मान्यता देण्यात आली.
ई क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत खेळ मैदानासाठी प्रेक्षागृह गॅलरी उभारण्याकरिता १५ कोटी रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच चिखली येथील आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या गृह प्रकल्पातील नवीन पंधरा इमारतीकरिता स्थापत्य विषयक कामासाठी ४२ लाख रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. यावेळी सुमारे २४ कोटी ३५ रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा सत्कारही स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी यांच्या हस्ते करण्यात आला.













