न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगररचिव विभागामार्फत ३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मा. जिल्हाधिकारी पुणे यांचेकडील पत्रानुसार ग्लोबल अडल्ट टोबेका सर्च २०१६ – १७ च्या सर्वेक्षणानसार धुम्रपान करणा-यांचे प्रमाण हे इतर राज्याच्या तुलनेने धूरविरहित व तंबाखू सेवनाचे जात आहे.
त्यामुळे तंबाख विषयी जनजागृती होणे व आपला परीसर व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त होणे गरजच आहे. सदर सर्व्हेनुसार राज्यातील १५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलाचे तंबाखू वापरण्याचे प्रमाण सन २००९-१० च्या तुलनेत २.९ % वरून ५.५ % पर्यंत वाढलेले आहे. त्यामुळे सर्व शैक्षणिक संस्था सुध्दा तंबाखुमुक्त होणे गरजेचे आहे.
यासर्व बाबी लक्षात घेता राज्यात सदर व्यसनाचे प्रमाण कमी करण्याकरीता सर्वांनी संयुक्तपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे.याचाच एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगरसचिव विभागातील सर्व कर्मचाऱ्यांसह स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी व नगरसचिव उल्हास जगताप यांच्या समवेत सामुहिकपणे तंबाखू विरोधी शपथ घेण्यात आली. तंबाखू विरोधी शपथ स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी वाचन करून, सर्व कर्मचाऱ्यांना दिली. याप्रसंगी नगरसचिव कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.













