न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी महापालिका सेवेच्या माध्यमातून शहराची सेवा केली त्यामुळे आज पिंपरी-चिंचवड शहर बेस्ट सिटी म्हणून नावलौकीकास येण्यास मदत झाली आहे असे मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवेतून माहे मे २०१९ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या ७५ अधिकारी व कर्मचा-यांचा सत्कार महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते पुस्तक, स्मृतीचिन्ह, सेवा उपदान व अंशराशीकृत धनादेश सुपूर्द करुन सन्मान करण्यात आला
या कार्यक्रमात स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते दत्ता साने, मनसे गटनेते सचिन चिखले, नगर सदस्य मोरेश्वर भोंडवे, नगर सदस्य अनुराधा गोरखे आदी मान्यवर उपस्थित होते.
नगरसदस्या अनुराधा गोरखे म्हणाल्या, सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांनी उद्यापासून आपले दिनक्रम निश्चित करून वेळ चांगल्या कामांसाठी द्यावा. तसेच इथून पुढचे आयुष्य स्वत:साठी जगावे. नोकरीमुळे राहून गेलेल्या आपल्या आवडी निवडी पुन्हा नव्याने जोपासाव्या व आनंदी जीवन जगावे असेही त्या म्हणाल्या.













