न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जून २०१९) :- भोसरी येथे कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात शुक्रवारी (दि. ३१/५ /२०१९) रोजी मिस्टर अँड मिस आणि किडस् पिंपरी चिंचवड २०१९ या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील सुमारे ४० मुला मुलींनी तसेच बालकांनी या सौंदर्य स्पर्धेत सहभाग नोंदविला. या स्पर्धेत रोहित पवार व समृद्धी मुळूक यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तसेच सिध्दार्थ मडिखांबे व मोनाली नाईक आणि आदित्य चौहान व तृप्ती खाडे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.
या स्पर्धेत बेस्ट फिजीक सुमीत नायर, बेस्ट वाॅक भारत चौधरी, फिटनेस क्वीन फिलीसा कुमार, मिस कॅट वाॅक श्रुती खांडीझोड मानांकन मिळाले. कार्यक्रमाचे संयोजन सुनिल तांबे व दिग्दर्शन आकाश पांडे, ईशा शर्मा व प्रसाद खैरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा पाठक यांनी केले.













