न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जून २०१९) :- आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त येणा-या सर्व वारकऱ्यांसाठी सर्व प्रकारच्या सोईसुविधा महानगरपालिकेच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे महापौर राहूल जाधव यांनी सांगितले.
आज स्थायी समिती सभागृहात झालेल्या आषाढीवारी पालखी सोहळा नियोजनाच्या आढावा बैठकप्रसंगी ते बोलत होते. महापौर राहूल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ई प्रभाग अध्यक्षा सुवर्णा बुर्डे, नगरसदस्या शैलजा मोरे, नगरसदस्य सुरेश भोईर, जावेद शेख, शहर अभियंता राजन पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त आर. एस. जाधव, सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे, चंद्रकांत इंदलकर, आशादेवी दुर्गुडे, अण्णा बोदडे, श्रीनिवास दांगट, आशा राउत, नगरसचिव उल्हास जगताप, सह शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे, संजय घुबे, संजय खाबडे, महावितरणचे कार्यकारी अभियंता राहुल गवारे, मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुंके, आरोग्य वैद्यकीय अधिकारी के. अनिल रॉय, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे, प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर, पराग मुंढे, ज्योत्स्ना शिंदे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. अरून दगडे, उपअभियंता बी. पी. लांडे, धानोरकर सी.एन, कोनवडेकर एन.पी, हनुमंत शिंदे, पवार आर.एम, सहाय्यक आरोग्याधिकारी एम.एम शिंदे, व्हि. के. बेंडाळे, पोलीस निरीक्षक सतिष नांदुरकर, प्रशांत अरदवाड, रंगनाथ उंडे, अन्न व औषध प्रशासनाच्या के. एल. सोनकांबळे, कुलकर्णी एस.एस, बेद आर.एम, गोसावी जी.आर, पानसरे एम. वायरलेस इनचार्ज थॉमस नरोन्हा, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा समितीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील, योगेश देसाई, ज्ञानेश्वर बिर, श्री. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख संजय मोरे, माणिक मोरे, मधुकर महाराज मोरे, संतोष मोरे, काशिनाथ मोरे, अजित मोरे, विशाल मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
आकुर्डी येथे मुक्कामाच्या ठिकाणी पुरेशी पिण्याच्या पाण्याची, शौचालयांची, पाण्याच्या टँकरची व प्रकाश योजनेची व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या. पालखी मार्गावर पुरेशी प्रकाश योजना असावी.आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात दर्शन बारी साठीची योग्य ती व्यवस्था करावी. पालखी मार्गावरचे अतिक्रमण, रस्त्यावरील खड्डे बुजवावेत व कचराकुंड्या स्वच्छ ठेवाव्यात. पंढरपूर पर्यंत वारक-यांसाठी पर्याप्त पाण्याची व्यवस्था करावी, तसेच महापालिकेमार्फत दरवर्षी येणा-या दिंडयांना भेटवस्तू देण्यात येते यावर्षी भेटवस्तू न देता त्यासाठी येणार खर्च दुष्काळग्रस्त भागातील आत्महत्या केलेल्या शेक-यांच्या परीवाराला किंवा त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत म्हणून देण्यात यावा अशाही सूचना यावेळी प्राप्त झाल्या.
पालखी मार्गावरील रस्त्याची कामे पूर्ण करण्याच्या सूचना महापौर राहूल जाधव यांनी दिल्या. तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशा सूचना पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिल्या. पालखी सोहळया दरम्यान जिल्हापरिषदेप्रमाणे दुचाकीधारक आरोग्य दुत ठेवण्याची व्यवस्था करावी तसेच पालखी मार्गावरील मटण व दारुची दुकाने बंद असावित तसेच पालखी सोहळ्या समवेत पाण्याचे टँकर व वैद्यकीय सेवा सुविधांसह अॅम्बुलन्सची व्यवस्था करून देण्याच्या सूचना या बैठकीत करण्यात आल्या. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयासमवेत अग्निशमन बंब देण्याची मागणी करण्यात आली यावर महापालिका सहकार्य करणार असल्याचे महापौर राहूल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी सांगितले. श्री संत तुकाराम महाराज पालखी परतीचा प्रवास चिखली मार्गे करण्याबाबत पालखी सोहळा प्रमुखांनी सकारात्मक निर्णय घ्यावा असे मत महापौर राहूल जाधव व विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने यांनी व्यक्त केले.
पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, पुरेशी सुरक्षा व्यवस्था, फिरते शौचालय यांची व्यवस्था करणे, निगडी ते दापोडी दरम्यान मेट्रोचे काम सूरु आहे. या सोहळयाच्या दरम्यान सदरचे काम दोन दिवस थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच पालखी सोहळा कालावधीत शहरात स्वच्छता ठेवणे, पालखी मार्गस्थ झाल्यानंतर रस्ते स्वच्छ ठेवणे व पालखी मार्गक्रमणामध्ये संबंधित सर्व विभागांनी चोख व्यवस्था करण्याच्या सूचना महापौर राहूल जाधव यांनी संबंधित सर्व विभागप्रमुखांना या बैठकीत दिल्या.













