न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विधी समिती, महिला व बालकल्याण समिती, शहर सुधारणा समिती आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक या चार विषय समितींच्या सभापतीपदाची निवड १४ जून रोजी होणार आहे.
सभापतीपदासाठी १० जून रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत अर्ज भरता येणार आहेत. महापालिका मुख्यालयाच्या तिस-या मजल्यावरील मधुकर पवळे सभागृहात १४ जून रोजी सकाळी ११ वाजता विषय समितींच्या सभापतीपदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल कामकाज पाहणार आहेत, अशी माहिती महापालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.
महापालिकेत सत्ताधारी भाजपचे बलाबल असल्याने सर्वंच समित्यांमध्ये भाजपचेच सभापती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सभापतीपदी वर्णी लागावी, यासाठी नगरसेवकांनी नेत्यांकडे फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे.















