न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जून २०१९) :- रुग्णालयात जात असलेल्या महिला डॉक्टरच्या दुचाकीला डंपरने धडक दिली. जमिनीवर कोसळल्यानंतर डंपरचे मागचे चाक पायावरून गेल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे.
ही घटना रविवारी (दि. २) रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे घडली. डॉ. सोनाली नानाराव नागोरे (२६, रा. बालेवाडी) असे जखमी त्या झालेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. सोनाली नागोरे पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नोकरी करतात. त्या सकाळी साडेदहाच्या सुमारास पिंपळे सौदागर येथून दुचाकीवरून जात होत्या. दरम्यान, मारुती शोरूमसमोरील बीआरटी रस्त्यावरून जात असताना पाठीमागून आलेल्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे डॉ. सोनल रस्त्यावर कोसळल्या. यावेळी डंपरचे चाक त्यांच्या एका पायावरून गेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.














