न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जून २०१९) :- महामेट्रोच्या वतीने रेंजहिल्स ते पिंपरी या ‘रिच वन’ चे काम सुरू आहे. त्यातील खडकी येथील जागेचे ना हरकत प्रमाणपत्र ‘अखेर दिल्लीच्या ना संरक्षण विभागाने महामेट्रोस दिले आहे. त्यामुळे महामेट्रोने खडकी व रेंजहिल्स भागांत काम सुरू केले.
संरक्षण विभागाने खडकी व रेंजहिल्स येथील जागेच्या बदल्यात जागेची मागणी केली होती. त्यावरून ना हरकत प्रमाणपत्र अडकून पडले होते. राज्य शासनाकडून जागा मिळाल्यानंतर संरक्षण विभागाने नुकतेच महामेट्रोला ते प्रमाणपत्र दिले आहे. त्याबाबत रीतसर करारनामा करण्यात आला आहे.
प्रमाणपत्र न मिळाल्याने महामेट्रोला खडकी व रेंजहिल्स भागात मेट्रोचे काम सुरू करता आले नव्हते. अखेर, प्रमाणपत्र मिळाल्याने मेट्रोने काम वेगात सुरू केले आहे. संरक्षण विभागाच्या हद्दीत खडकी व रेंजहिल्स हे दोन मेट्रो स्टेशन आहेत. तर, रेंजहिल्स येथे मेट्रोचा डेपो आहे.















